The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : अनेक दिवसांपासून चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून आज गुरुवार ७ जुलै २०२२ पासून प्रशासकीय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा माळा चंद्रपूर येथे सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाचे उद्घाटन चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहआयुक्त तथा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपसंचालक डिगांबर चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील, पोलीस निरीक्षक रविंद्र येरचे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली,अधिकारी, कार्यालयातील कर्मचारी, आकाश कुमरे, अभय मशाखेत्री, अमित शिवरकर, नितेश कोसरे, शनिदेव कन्नाके, प्रमोद डोळस, दिपक पडगेलवार, शास्त्रकार आदि कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्राकरिता लांब पल्ला गाठून गडचिरोली येथील कार्यलयात यावे लागत होते. मात्र आता चंद्रपूर येथे कार्यालय सुरू झाल्याने अधिक सोयीचे झाले आहे.