– एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवनीतग्राम येथील तीन विक्रेत्यांच्या घरातून जवळपास ३० हजार रुपये किंमतीची बिअर, व्हिस्की, रम, देशी व १५ लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई घोट पोलिस, मुक्तिपथ, सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ, माडे मुधोली गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या बुधवारी केली आहे.
नवनीतग्राम येथे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच घोट पोलिस, मुक्तिपथ, सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ व गाव संघटनेच्या महिलांनी तपासणी केली असता एका महिलेसह गोविंदा सरकार, दादाजी मोहुर्ले या तीन दारू विक्रेत्यांच्या घरातून व विदेशी दारू, देशी दारू व १५ लिटर मोहफुलाची दारू असा एकूण जवळपास ३० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी तिन्ही दारू विक्रेत्यांवर घोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीमंगल, मुक्तिपथ उपसंघटक आनंद सिडाम, ग्रामसभा अध्यक्ष सुवर्णा मडावी, कमलाबाई बांबोळे, भूमिका दहागावकर, छाया दुर्गे, रेखा दुर्गे, सायबाच्या उंदीरवाडे, अंकुश दुर्गे, आकाश उराडे, ऋषभ दुर्गे, राजकुमार बांबोळे, चरणदास खोब्रागडे, चरणदास दुर्गे आदी गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
