भारतात उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

834

– जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा
The गडविश्व
नवी दिल्ली, ८ जुलै : जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे आज शुक्रवार ८ जुलै २०२२ रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, उद्या ९ जुलै रोजी भारत देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here