– बाम्हणी सर्कलमध्ये सर्वाधीक २६७.० मीमी पाऊस
The गडविश्व
गडचिरोली, 9 जुलै : जिल्हयासाठी हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. जिल्हयात पावसाने मुसंडी मारली आहे. बाम्हणी सर्कलमध्ये सर्वाधिक २६७.० मीमी पावसाची नोंद झाली असून जिल्हयात गेल्या २४ तासात ४४.३ मीमी पावसाची नोंद झाली आहे तर १ जून २०२२ पासून आतापर्यंत ३७०.७ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हाभरात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस पडल्याने काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे मार्ग देखील बंद आहेत. बाम्हणी सर्कल मध्ये गेल्या २४ तासात सर्वाधिक २६७ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हे मार्ग आहेत बंद
ताडगाव- हेमलकसा (कुमारगुडा व हेमलकसा नाल्यावरूनण पाणी वाहत असल्याने ८ जुलैच्या सकाळी ५ वाजतापासून बंद आहे.)
आष्टी-आलापल्ली (मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने आज ९ जुलै सकाळी ४ वाजता पासून बंद आहे.)
आलापल्ली-सिरोंचा (तानबोडी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने आज ९ जुलै सकाळी ४ वाजता पासून बंद आहे.)
कमनचेरू-आलापल्ली (स्थानिक नाल्यावरून पाणी वाहत असल्याने आज ९ जुलै सकाळी ४ वाजता पासून बंद आहे.)
तसेच सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेला लागून असलेले कर्जेली, रमेशगुडम, क्रिष्टय्यापल्ली, पोर्ला माल, कोपेला हया गावादरम्यानचे छोटे छोटे नाल्यांमुळे सदर मार्ग बंद आहे.
अहेरी तालुक्यातील गोलकर्जी हे ९ कुटुंब असलेल्या २० व्यक्तीसंख्येचे गावा पुरग्रस्त असल्याने त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गेलाकर्जी येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच अहेरी तालुक्यातीलच लिंगमपल्ली येथील २५ व्यक्तींना गावातील सुरक्षित उंचस्थळी स्थलांतरीत केले आहे.
हवामान विभागाने ९ ते १२ जुलै दरम्यान जिल्हयात अतिवृष्टी होण्यार असल्याबाबत संबंधित सर्व विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्हयातील बहुतांश भागात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता वर्तविली आहे.
चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ दरवाजे उघडले असून विसर्ग २५३३ क्युमेक्स एवढा आहे.