जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आलापल्ली येथील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता आले धावून

786

– पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत
The गडविश्व
अहेरी, ९ जुलै : तालुक्यातील आलापल्ली येथील वॉर्ड क्र.६ मध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली, अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील साहित्यांचे नुकसान झाले. जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन आर्थिक मदत केली.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली, काही गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. पूरस्थिती निर्माण झाल्याने याचा फटका अनेक गावांना बसला आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. घरात पाणी शिरल्याने साहित्यांचे नुकसान झाले. आज माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पूरग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली. मदत कार्य बानूबाई आत्राम, सुरेखा सन्ड्रा, रामबाई सिगनेर, नागणा रामगिरीवार, अनिल बोलेम यांना करण्यात आले.
यावेळी जूलेख शेख, विजय बोमनवार, गटया बुसावार, पेंटया मुडसुवार, शंकर जगीडवार, शायलू दुपमवार, रामया बोमनवार, राजणा मेकलवार, शंकर आत्राम, बोरकुटे, मोंडी येरावार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here