The गडविश्व
ता.प्र /धानोरा, १० जुलै : नुकताच नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात गडचिरोली जिल्ह्यातील रांगी केंद्रातील विद्यार्थ्यांनी करिष्मा दाखवत आपल्या यशाचा पाया अधिक मजबूत , घट्ट करित दरवर्षी प्रमाणे यंदाही रांगी केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय घोट साठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथील दोन विद्यार्थ्यांची तर रांगी येथील एकाची निवड झाली आहे. त्यात कुमारी सुयश प्रभाकर नगराळे, अंजली संतोष मडावी हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथिल आहेत तर रांगी येथील विशाखा रविंद्र बोरसरे या विद्यार्थीनींनी दणदणीत व दैदिप्यमान यश संपादन करून जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी मध्ये प्रवेश मिळविला आहे.
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असून धानोरा तालुक्यामध्ये रांगी केंद्राने परत एकदा आम्हीच…. हा संदेश याद्वारे दिलेला आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशात केंद्र प्रमुख, वर्गशिक्षक, शिक्षक यांचा मोलाचा वाटा असून मुख्याध्यापक व सर्व सहयोगी शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे रांगी केंद्राच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.