– आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबिरात २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
आरमोरी, ११जुलै : रक्तपेढीमधील रक्ताची कमतरता आणि रक्तासाठी होणारी धावपळ लक्षात घेता व पावसाळ्यात रक्तदात्यांची जोखीम रोखण्यासाठी स्वयं रक्तदाता समितीच्या वतीने आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात ९ जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
गडचिरोली येथे रक्तसाठ्यात कमतरता भासली आहे आणि रक्तदात्यांना पाऊसाळ्यात मुसळधार पाऊसामध्ये भिजत बऱ्याचवेळा रक्तदाता रक्तदान करण्यासाठी जात असताना अपघाताची शक्यता असते. तसेच एखादा रक्तदात्यांचा बी.पी. कमी जास्त असल्यास, हिमोग्लोबीन कमी असल्यास रक्तदात्यांना अशा प्रकारच्या कारणांमुळे रक्तदान न करता परत यावे लागते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक खर्च आणि रक्तदात्यांना जाण्याचा त्रास होतो. व रुग्णाला रक्त पुरवठा करण्यास विलंब लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून “स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या” वतीने रक्तदान शिबिर रक्तदात्यांच्या आणि रुग्णांच्या हितासाठी “स्वयं रक्तदाता जिल्हा समिती” द्वारा व समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत , उपाध्यक्ष निशिकांत नैताम , कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर, सदस्य दर्शन चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
स्वयं रक्तदात समितीच्या वतीने वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेण्यात येतात. तसेच वेळेवळ आवश्यक असल्यास रक्त उपलब्ध करून देण्यासही पुढाकार घेत असतात. स्वयं रक्तदाता समितीमार्फत जिल्हयातील अनेक दुर्गम भागात जावून रक्तदान विषयी मार्गदर्शन करून रक्तदान शिबीरे राबविण्यात आले. अनेकांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद देत रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे.
आरमोरी येथील रक्तदान शिबीरात राजेश येरमे, अरविंद सेलोटे, सुरेश सेलोटे, अंकुश दुमाने, श्याम राऊत, रुपेश निंबेकर, त्रिदेव जांभुळे, अमित बोरकर, केतन घोषे, तुषार झुरे, प्रीतम धंदरे, महिंद्र ढोंगे, रितेश उईंवर, आदित्य बगमारे, भारत रामटेके, अनुप रामटेके, वृषभ तिजारे, डॉ. अभिजीत मारबते, मुकुंद बांते, कपिल पराते, शुभम हुमने, निखील नैताम, मनिष साहरे इत्यादी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार दहाट , आरमोरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, डॉ. अभिजित मारभते, प्रफुल खापरे, सचिन लांजेवार, निखिल धार्मिक, केवळराम किरणापुरे, अजय कुथे, करण कुथे, फिरोज पठाण यांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात सहकार्य केले.
सदर रक्तदान शिबीर “स्वयं रक्तदाता जिल्हा समिती” चे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर , सदस्य दर्शन चंदनखेडे यांनी पुढाकार घेतला .
यावेळी जिल्हा रक्तपेढी गडचिरोली चे कर्मचारी डॉ. प्रणाली खोब्रागडे, निलेश सोनावणे, देशमुख यांनी रक्तदात्यांची तपासणी करून योग्य पद्धतीने रक्तदान शिबिर पार पाडले.
उप जिल्हा रुग्णालय आरमोरी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार कोरेटी, डॉ. उईके, गौरी साळवे, आशिक वासनिक, परिचारिका माया पारधी, शारदा तुपटे, सरिता निकेसर, प्रतिभा आठवले या सर्वांनी रक्तदानासाठी व्यवस्था करून दिली.