१३ ला आपचे विज दरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन

300

The गडविश्व
गडचिरोली, ११ जुलै : विज दरवाढ विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने येत्या१३ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नुकतीच आम आदमी पार्टी गडचिरोली येथिल कार्यकर्त्यांनी स्थानिक वैभव हाॅटेल येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानूमते विजदरवाढ विरोधात राज्यव्यपि आंदोलन यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेतवर असलेल्या सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टिने बुधवार १३ जुलै २०२२ रोजी ठिक १२:०० वाजता इंदीरा गांधी चौक गडचिरोली येथे राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत येणारे सरकार जनतेला खोटे आश्वासन देत आहे. मात्र आम आदमी पार्टी दिल्ली पंजाब मध्ये जनतेच्या आस्वासनाची पूर्तता करत असून जनतेला २०० युनिट प्रति महिना वीज मोफत देत आहे. त्यामूळे दिल्लीतील ७२ टक्के जनतेला विज बिल शुन्य येते. तसेच पंजाब मधील जनतेला १ जुलै २०२२ पासून ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आस्वासन पूर्ण केले आहे.परंतू महाराष्ट्रात
सरकारला अडीच रुपये युनिटला मिळणारी विज १० ते १५ रुपये युनिट विकणारे सावकारी सरकार आहे. आता या सावकारी सरकारच्या विजदरवाढ विरोधात आम आदमी पार्टीने कंबर कसली असून १३ जुलै २०२२ रोजी काढण्यात येणाऱ्या जनहीतार्थ आंदोलनामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होऊन विज दरवाढीचा विरोध करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे .
या बैठकिला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर संयोजक कैलास शर्मा, शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे, शहर कमेटि सचिव संतोष कोटकर, संयोजक अलका गजबे, शहर महिला संयोजक समिता गेडाम, महिला सचिव मिनाक्षी खरवडे, युवा सयोजक सोनल नन्नावरे, युवा सचिव नामदेव पोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here