– समस्या जाणून केली तात्काळ मदत
– तलाठी व प्रशासनाला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी
The गडविश्व
अहेरी, १२ जुलै : अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील आलापल्ली, नागेपल्ली,मोदूमडगू,मरमपल्ली, येनकापल्ली या गावातील काही घरांमध्ये काल ११ जुलैच्या मध्यरात्री पासून पुराचे पाणी शिरले होते. याबाबत माहिती होताच आज १२ जुलै रोजी पूर ओसारताच जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली व तात्काळ मदत करत तलाठी व प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
अहेरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाले. तालुक्यातील काही गावामधी काही घरांमध्ये पुराचे पाणी काल मध्यरात्रीपासून शिरले. यायाबत जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहीत होताच रात्रोपासून याविषयी माहिती घेत होते. पूर असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जात येत नव्हते तरी देखील आपल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याविषयी व त्यांच्या जेवणाची व शुद्ध पाण्याची वेवस्थेबद्दल ग्रामपंचायत नागेपल्लीचे सरपंच व सदस्य यांच्याशी चर्चा केली. व आज पूर ओसरताचा कोणताही विलंब न करता पूरग्रस्तांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व शक्य होईल तेवढी मदत तात्काळ केली. ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही तलाठी व प्रशासनाला केली.