The गडविश्व
गडचिरोली, १३ जुलै : गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२२ करिता घेण्यात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून तात्पुरती शारिरीक चाचणीस पात्र उमेदवारांची यादी ३ जुलै २०२२ रोजी प्रसारीत करण्यात आली होती. सदर यादीमध्ये उमेदवारांना त्यांचे आक्षेप नोंदविण्यासाठी ०७ जुलै २०२२ चे सायं. ०६.०० वा. पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांकडून आलेल्या आक्षेपावरून सदर यादीमध्ये किरकोळ बदल करून अंतिम यादी प्रसारीत करण्यात आले आहे. व काही सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
यादी डाउनलोड करण्याकरिता क्लिक करा : Gadchiroli police final physical qualified candidates list
सूचना
• उमेदवारांस पुन्हा कळविण्यात येते की, गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसच सदर पोलीस भरतीचा लाभ घेता येईल.
• शारीरिक चाचणीचेवेळी सर्व कागदपत्रे ( जात प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी) सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवाराला बाद करण्यात येईल.
• शारीरिक चाचणीची तारीख व वेळ उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी.
Gadchiroli police final physical qualified candidates list
गडचिरोली पोलिस शिपाई भरती -2022 शारीरिक चाचणी पात्र उमेदवारांची अंतिम यादीP