गडचिरोली शहराला पावसाने झोडपले : अनेक परिसर जलमय

973

– अनेकांच्या घरात घुसले पावसाचे पाणी
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : शहराला काल रात्रो ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सुमारे एक तास आलेल्या पावसाने अनेक परिसर जलमय झाले होते तर अनेकांच्या घरात पाणी शिरले. यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील धानोरा मार्गावरील वैभव हॉटेल, सिटी हॉस्पिटल मध्ये पाणी शिरले, तसेच या मुख्य रस्त्यावरही पाणी साचले होते अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डिंगचा मागचा परिसर व मुख्य रस्त्यावर तसेच मूल मार्गावरील महिला महाविद्यालय परिसर, बजाज शोरूम परिसर, अयोध्या नगर, व आयटीआय चौक पूर्णतः जलमय झाले होते. एक तास आलेल्या मुसळधार पावसाने शहराला जणू झोडपुनच काढले. तसेच पोटेगाव रोडवरील पावार हाऊसच्या आवारातील पाणी रामनगर मध्ये शिरले, अनेकांच्या घरात पाणी जमा झाले त्यामुळे नागरिकांना जेवनसोबत संपूर्ण रात्र खाटेवर काढा लागली.
दरम्यान हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरत पावसाने शहराला झोडपूनच काढले यामुळे अनेक परिसर जलमय झाले असून जनजीवन विस्कसळीत झाले आहे. पुढील ३-४ दिवस अजून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here