रांगी जि.प.शाळेतील मोडकळीस इमारतीच्या भिंती धोकादायक

510

The गडविश्व
ता.प्र. / धानोरा, १६ जुलै : रांगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या आवारातील मध्यभागी असणारी इमारत मोडकळीत आली असून सदर इमारतीचे छपर काढले आहे व उभ्या असलेल्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. सदर भिंति शालेय विद्यार्थ्यांना धोकादायक असल्याने सदर भिंती लवकरात लवकर पडण्याची मागणी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

धानोरा तालुक्यातील रांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे वर्ग १ ते ७ असुन शाळेत ऐकून १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील शाळेच्या मध्यभागी मोठी जूनी इमारत आहे. ही इमारत मोडकळीस आलेली असुन मोडकळीस आलेल्या इमारतीच्या वरील छप्पर काढण्यात आलेले आहे. मात्र भिंती कायम उभ्या ठेवलेल्या आहेत. आठवडाभर पडत असलेल्या सततच्या पावसाने इमारतीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत . इमारतीच्या उभ्या असलेल्या भिंती परिसरात ६ ते १४ वर्ष वयोगटातील लहान लहान मुले-मुली खेळत बागडत असतात. अशातच अनावधानाने भित पडुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न पालक विचारीत आहेत. सदर इमारतीच्या भिंती भुईसपाट करण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळेतील अबोल बालकांना या भिंती बाबत काहीच कळत नाही तसेच शिक्षक कधी आत कधी बाहेर असतात त्यामुळे अनुचित घटना घडू नये यासाठी शाळा समितीने ठराव घेवून ग्रामपंचायतीला शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच उन्हाळ्यात तीनदा पत्रव्यवहार केला तसेच शाळा सुरू व्हायच्या काही दिवसाअगोदार व शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा भिंती पाडण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचे कळते. तरीही मात्र ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असून सदर इमारतीच्या भिंतिबाबत वेळीच निर्णय घेन्यात यावे अशी मागणी होत आहे.

– इमारती पाडण्याबाबत ग्रामपंचायतीला आता पर्यंत तिनदा पत्रव्यवहार केला. सदर इमारतीच्या संबंधाने अनुचित घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने भिति भुईसपाट कराव्यात.

– नरेंद्र भुरसे
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here