टीईटी गैरव्यवहार प्रकरणी आता मोठी कारवाई होणार : शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची होणार पडताळणी

239

THE गडविश्व
पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणी आता मोठी कारवाई होणार आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेत गैरव्यवहार उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण उपसंचालक यांनी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यामुळे आता बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे.
राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here