दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण

219

The गडविश्व
गडचिरोली, २० जुलै : महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कायरंत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांग साठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, मुंबई ची शासन मान्यताआहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आह सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधा.

प्रवेशा साठी नियम अटी व सवलती : 

अभ्यासक्रमाचे नांव शैक्षणिक पात्रता : अ) सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणककोर्स) किमान इ.8 वी पास मोटार ॲन्ड आमेचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इ. 9 वी पास वयोमर्यादा : 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी : 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. सोई व सवलती प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय,अद्यावत बपरी पूर्ण संगणक कार्यशाळा,भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागा कडून स्वयंरोजगारा साठी व्यवसाया साठी बीज भांडवल योजना.

अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावेत :

प्रवेशअर्ज व माहिती पत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्या जवळ,मिरज ता.मिरज जि.सांगली पिन कोड:- 416 410 नंबर 0233-2222908 मोबाईल 9922577561/9975375557 या पत्यावर पोस्टा व्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील.

प्रवेशा साठी कोणती ही फी आकारली जाणार नाही. प्रवेशअर्ज पूर्ण पणे भरुन फोटोसह संस्थे कडे पाठवावत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जा सोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्या बाबत चे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात . प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै 2022 पुर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधी चा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधा. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजने चा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात असलेल्या गरजू अपंग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावा. असे अधिक्षक शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here