गडचिरोली : नक्षल्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

2237

– घटनेने जिल्ह्यात खळबळ

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढत माजी सरपंचाची हत्या केल्याची घटना आज २० जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आली आहे. रंगा मडावी (५०) असे हत्या केलेल्या माजी सरपंचाचे नाव असून ते भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील माजी सरपंच होते.प्राप्त माहितीनुसार, मृतक रंगा मडावी हे मन्नेराजाराम येथून मडवेली येथे जात असतांना वाटेतच नक्षल्यांनी त्यांची हत्या केल्याचे कळते . मात्र हत्येचे कारण कळू शकले नाही. मन्नेराजाराम गावनजीकच्या गेर्राटोला येथील एप्रिल २०२२ मध्ये मीना सिडाम हत्याकांड प्रकरणी रंगा मडावी याच्या मुलाचा हात होता यावेळी रंगा मडावीला सुद्धा अटक करण्यात आली होती व जामिनावर बाहेर होता असे कळते. दरम्यान आज रंगा मडावी ची नक्षल्यांनी हत्या केल्यानंतर हत्येमागे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here