– मागील ३ दिवसापासून होता बेपत्ता
The गडविश्व
चंद्रपूर,२१ जुलै : जिल्ह्यातील नकोडा (Nakoda) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिलीप लोणारे असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक दीपक लोणारे हा नकोडा ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता अशी माहिती आहे. तो मागील तीन दिवसापासून बेपत्ता होता. दरम्यान याबाबत घुगूस (Ghughus) पोलिसात तक्रार देण्यात आली होती.अशातच आज गुरुवार २१ जुलै रोजी नकोडा येथे चारचाकी वाहनात त्याचा मृतदेह आढळल्याचे सायंकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती घुगूस पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास घुगूस पोलीस करीत आहे.
#chandrapur #ghughus
