गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा आता ऑनलाईन होणार

189

– १९ जानेवारी पासून संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार होणार परीक्षा
THE गडविश्व
गडचिरोली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ च्या १० जानेवारी पासून होणाऱ्या लेखी परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्याचे परीपत्रक ५ जानेवारी रोजी जाहीर केले होते. परंतु आता सदर परीक्षा ही संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारी पासून ऑनलाईन MCQ (बहुपर्यायी) पद्धतीने पार पडणार असल्याचे विद्यपीठाचे कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.चिताडे यांनी काल परिपत्रक जारी करून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, प्राचार्य व संबंधित विद्यार्थ्यांना कळविले आहे. तरी सदर परीक्षेचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

 

शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या तारखेबाबत…

https://unigug.ac.in/portal/administrator/administrator/images/news_attachment/Exam_192_060122.pdf

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here