The गडविश्व
गडचिरोली, २१ जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय, गडचिरोली अंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सरासरी ६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झाले असतील अशा विद्यार्थ्यांना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्याकरीता विद्यार्थ्यांनी अर्ज करतेवेळी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला, शीधा पत्रिका (रेशन कार्ड), पुढील वर्षात प्रवेश घेतलेले बोनाफाईड सर्टीफिकेट, दोन पासपोर्ट फोटो, याप्रमाणे कागदपत्रे सोबत जोडून २५ जुलै २०२२ पर्यंतच्या कालावधीत जिल्हा कार्यालय, गडचिरोली येथे सर्व दस्तऐवज सांक्षकित दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावे. असे जिल्हा व्यवस्थापक साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांनी कळविले आहे.