पुढील दोन दिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करणार गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

400

The गडविश्व
गडचिरोली, २२ जुलै : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे, शेती, शेतकरी, लोकांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीत माजी आमदार अविनाश वारजूरकर, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव शिवा राव, प्रदेश सचिव संदीप गडमवार आहेत.
२३ आणि २४ जुलै रोजी या समितीच्या वतीने जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी भागातील पाहणी दौरा करण्यात येणार असून या दौऱ्यात जिल्ह्यातील नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी आ.पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते सह जिल्ह्यातील सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते तालुका अध्यक्ष सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here