– नगरपंचायत चे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २४ जुलै : येथिल विद्यानगर वार्ड नंबर १ अंगणवाडी जवळ घराचे बांधकाम चालू आहे. त्या बांधकामचे साहित्य रेती , गिट्टी, माती नालीत टाकल्याने नाली बुजून गेली आहे. त्यामुळे मागिल पंधरा दिवसापासुन पाऊस मोठया प्रमाणात पडत असल्याने ते पाणी नाली मधून न जाता नालीचे पाणी साचून राहत आहे व त्या नालीचे पाणी हेमंत भानुदास रामटेके यांच्या घरा सभोवताल साचले आहे. याबाबत चे पत्र मुख्याधिकारी धानोरा यांना शनिवार २३ जुलै रोजी दिले आहे. त्यांनी नाली तील पाणी जाण्यासाठी नाली तील गिट्टी ,रेती काढून नाली मोकळी करून द्यावी व मला न्याय दयावा अश्या आशयाचे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे. दरम्यान विद्यानगर वार्डाच्या नगरसेविका अल्का ताई मशाखेत्री यांनी सुद्धा जागेवर येऊन पाहणी केली व लवकरच नाली साफ करण्यास सांगितले जातील असे बोलून दाखवले आहे . परंतु या समस्येकडे आत मुख्याधिकारी लक्ष देतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.