जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून लिंगमपली येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप

582

The गडविश्व
अहेरी : तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या अतिदुर्गम लिंगमपली येथे दरवर्षी पूर येत असतो. यावर्षी सुद्धा पूर आल्याने पुराच्या पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले होते. सदर गावाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली असता नागरिकांनी या गावात दरवर्षी पूर येत असतो त्यामुळे प्रशासनाने सदर गावांच्या पुनर्वसन करण्यात यावी अशी मागणी केली. गांवात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी व संस्थानाकडून मदत केली आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी उद्भवू नये म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वतीने या गावात पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेल्या वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम, रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, राजारामचे माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच मोंडी लेंनगुरे, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे, प्रिया पोरतेट, विलास बोरकर, दासु काम्बडे, गंगाराम मडावी, माधव कूड़मेथे, दिपक अर्का, नारायण चालुरकर, जितेंद्र पंजलवार, नरेंद्र गरगम, प्रमोद गोडसेलवार, गुलाब देवगडे, लक्ष्मण जनगाम,सोहनलाल चापले, वासुदेव सिडाम, वसंत नेरला, सीताराम नेरला, बाजीराव सिडाम व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here