खळबळजनक : नालीमध्ये आढळला इसमाचा संशयास्पद मृतदेह

7143

– गडचिरोली शहरातील खळबळजनक घटना

The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गाच्या बाजूने हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नालीमध्ये इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गाच्या बाजूने हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नालीमध्ये इसमाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नालीतून बाहेर काढला. मृतक इसमाची ओळख अदयाप पटलेली नसून मृतकाच्या कपाळावार धारदार शस्त्राचे वार केल्याच्या जखमा, कान कापलेले तसेच गळयात दोरीसारखा फास व कंबरेला मागच्या बाजूने मार आहे. त्यामुळे ही हत्याच असल्याचे बोलले जात आहे.सदर इसमाची हत्या करून हत्यारांनी मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास नालीत टाकला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मृतदेह उलटया स्थितीती ग्रीन मॅट झाकलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे ३०-३५ वर्ष दरम्यान आहे. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून सीसीटीवी फुटेज मधून काही सुगावा लागतो काय याचा सुद्धा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी मृतदेह ताब्याब घेतला आहे. बातमी लिहेस्तव इसमाची ओळख पटविण्याचे काम पोलीसांकडून सुरू होते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. ©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here