– शहरातील रामनगर वार्डातील रस्त्यालगतच्या नालीत आढळला मृतदेह
The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : शहरातील पोटेगाव मार्गावर असलेल्या जिलानी बाबा दर्गाच्या पाठीमागील परीसरात रस्त्यालगत असलेल्या नालीत अनोळखी इसमाचा मृततेह आढळल्याची खळबजन घटना आज २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खडबळ उडाली असून अनोळखी मृतदेहाबाबत गडचिरोली पोलीसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृतकाची वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष दरम्यान, अंगात काळया रंगाचा लोअर घातलेला डोक्यास केस, दाढी मिशी वाढलेली, रंग-सावळा, बांधा-सडपातळ, डोक्यास गंभीर मार लागलेला दिसत असून गळा आवळलेला दिसत आहे.
तरी सदर मृतकाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील 017132-295334 या क्रमांकावर अथवा पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या 9075102335, तपासी अधिकारी चेतनसिंह चौहान 7350369751 या क्रमांकावर संपर्क साधून कळविण्यात यावे असे आवाहन गडचिरोली पोलीसांमार्फत करण्यात आले आहे.©