– सिरोंचा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा केला दौरा
The गडविश्व
सिरोंचा : गडचिरोली जिल्यातील दक्षिणेकडच्या सिरोंचा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज केला. या दरम्यान त्यांनी सिरोंचा तालुक्यातील नागराम या गावाला भेट देत तेथील समस्या जाणून घेत पाठपुरावा करून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोली जिल्हयात मुसळधार पावसाने सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले तर काहींना गावातून स्थलांतर करावे लागले. जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे नेममीच मदतिला धावून येत असतात. आज त्यांनी सिरोंचा तालुक्याचा दौरा करता अनेक गावांना भेट देत मदतही केली. दरम्यान सिरोंचा तालुक्यातील नागराम या गावात भेटे देवून तेथील पुरपीडीतांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर शासनाकडे मदतीकरीता पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.
यावेळी आविस कार्यकर्ते आदी उपस्थित होते.