– ८० हजारांची लाच स्विकारतांना अटक
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथील पोलीस नाईक खासगी इसमाच्या हस्ते ८० हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज २८ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. मनोज कुनघाडकर (३९) असे लाचखोर पोलीस नायकाचे नाव आहे तर तिरूपती नागेश बोल्लेवार (४२) असे खासगी इसमाचे नाव आहे .सदर कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांना अहेरी मार्गे भामरागड येथे दारूच्या वाहतुकीकरीता पोलीस नाईक मनोज कुनघाडकर यांनी १ लाख रूपयांची मागणी केली. मात्र तक्रारदारास सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंध विभाग येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आज २८ जुलै रोजी सापळा रचला असता तडजोडीअंती ८० हजार रूपयांची लाच आलापल्ली येथील जनरल स्टोर्स दुकान मालक तिरूपती नागेश बोल्लेवार (४२) याच्या मार्फतीने स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी पोलीस नाईक मनोज कुनघाडकर व खासगी जनरल स्टोर्स दुकान मालक तिरूपती नागेश बोल्लेवार यांच्या विरूध्द अहेरी पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, श्रीधर भासले, सफौ प्रमोद ढोर, नापोशि राजेश पदमगिरवार, किशोर जौजारकर, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप घोरमोडे, संदिप उडाण, चापोहवा तुळशिदास नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली. ©
#acbgadchiroli #gadchiroli #acbtrpd