– गडचिरोली पोलीस विभागामार्फ़त
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२२ ची पात्र उमेदवारांची अंतिम शारीरिक चाचणी यादी १२ जुलै २०२२ रोजी प्रसारीत करण्यात आली होती. याबाबत उमेदवारांना शारीरिक चाचणीची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येणार असल्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र सध्या पावसाळा सुरू असून, शारीरिक चाचणी करता उमेदवारांना अडचणी उद्भवू शकतात, त्यामुळे सध्या शारीरिक चाचणी घेणे सोयीस्कर राहणार नाही. तरी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२२ च्या पात्र अंतिम शारीरिक चाचणी यादीतील सर्व उमेदवारांनाच्या शारीरिक चाचणी तारीख, पावसाळा कमी झाल्यावर निश्चित करून सर्व उमेदवारांना कळविण्यात येणार आहे असे गडचिरोली पोलीस विभागामार्फ़त कळविण्यात येत आहे.
१२ जुलै २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२२ ची जी पात्र उमेदवारांची अंतिम शारीरिक चाचणी यादी प्रसारीत करण्यात आली होती. त्यात कोणताही बदल होणार नाही. याबाबत उमेदवारांनी कोणताही संभ्रम निर्माण करू नये.