दिव्यांग रजनीकांतच्या मदतीकरिता जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आले धावून

359

– केली आर्थिक मदत
The गडविश्व
सिरोंचा, २९ जुलै : तालुक्यातील असरअल्ली येथील दिव्यांग असलेल्या रजनीकांतला जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.
असरअल्ली येथील रमेश दांदेरा परिवारात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकीकडे मोठा मुलगा जन्मापासून अपंगत्व तर दुसरीकडे घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांचे कसेबसे पालन पोषण करत आले. काही दिवसांपूर्वी दिव्यांग असलेल्या रजनीकांतच्या आईचा मृत्यू झाल्याने रजनीकांतचे पालन पोषण त्यांची लहान बहीण करत आहे. परिस्थती हलाखीची असताना रजनीकांतचे पालन पोषण करणे कठीण जात असल्याची माहिती असरअल्ली येथील अविसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडावार यांना देताच रजनीकांतच्या घरी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या योजना दांडेरा कुटुंबा पर्यंत पोहचवून देण्यासाठी अविस कटिबद्ध असल्याचे यावेळी कंकडालवार यांनी सांगितले.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार, अविस अध्यक्ष बानय्या जनगाम, अविस जेष्ठ नेता शंकर मंदा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी, उपसरपंच सल्ला ,माजी सभापती भास्कर तलांडी, माजी जि.प सदस्य अजय नैताम, सरपंच रमेश तैनेनी, सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच दिलीप गंजीवार, न.प सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार, किरण वेमुला,संतोष भिमकरी, अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, सतीश जवाजी, साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे, संजय चिंताकन्नी, सागर कोठारी, समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी, सडवली राजु गूडूरी, दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले, लक्ष्मण गावडे, कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी, महेश तलांडी, संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here