– १५ जणांची कोरोनावर मात , सक्रिय रुग्ण आता ५८
The गडविश्व
गडचिरोली, २९ जुलै : जिल्हयात आज ५५२ कोरोना तपासण्यां करण्यात आल्या त्यापैकी आज तब्बल २३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर १५ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे.
जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३७७३७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३६८८९ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता ५८ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१५ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०५,आरमोरी तालुक्यातील ०१,चामोर्शी तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील ०३, वडसा तालुक्यातील ०३, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०६, आरमोरी तालुक्यातील ०१, व चामोर्शी तालुक्यातील ०५, अहेरी तालुक्यातील ०१, धानोरा तालुक्यातील ०१, कुरखेडा तालुक्यातील ०१ जणाचा समावेश आहे.