– घटनस्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्यही ताब्यात
The गडविश्व
दंतेवाडा, ३० जुलै : जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला आणखी एक यश मिळाले आहे. ५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली राकेश उर्फ बोधरा मरकम याला डीआरजी जवानांनी ठार केले आहे. दरम्यान घटनास्थळाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात पिस्तूल व इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी घटनेला दुजोरा दिला आहे
सुकमा आणि दंतेवाडा (sukma-dantewada) जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील नाहनी गुद्राच्या जंगलात सशस्त्र नक्षल्यांच्या उपस्थितीची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे या दोन्ही जिल्ह्यातून फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला. जवान घटनास्थळी पोहोचताच नक्षल्यांनी गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात जवानांनी एका नक्षल्याचा खात्मा केला आहे.
ठार झालेला नक्षली राकेश मरकम हा काटेकल्याण क्षेत्र समितीचा सदस्य होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच मृतक नक्षली राकेश मरकम हा नक्षल्यांचा प्रमुख नेता श्याम उर्फ चेटू दादाचा बंदूकधारी होता अशी माहिती आहे. दरम्यान नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह त्यांच्या मृत साथीदारांच्या नावाने साजरा केला जात आहे. शहीद सप्ताहातच जवान त्यांच्या गुहेत घुसून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. या चकमकीकडे मोठे यश मानले जात आहे.