The गडविश्व
सावली, ३१ जुलै : महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष, विकासपुरुष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावली तालुकाच्या वतीने सावली ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील कॅन्सर ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली तर ठिक ठिकाणी वृक्ष रोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार, सावली भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश गड्डमवार, अर्जुन भोयर,महिला भाजप शहराध्यक्ष गुड्डी सहारे, माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत, निखिल सुरमवार, गौरव संतोषवार, राकेश कोंडबत्तुनवार, हरीश जक्कुलवार, राहुल लोडेलीवार, लोकनाथ रायपुरे, राकेश वीरमलवार, मयूर गुरनुले, संगीता उतूरवार,सरिता वाघ, सिंधुताई मराठे या पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
