The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ८ मार्च २०१९ अन्वये केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील वनउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बॅकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया या योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front End Subsidy १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टॅडई-२०२०/प्र.क्र.२३/अजाक, ९ डिंसेबर २०२० अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.सदर योजनेकरिता इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी केले आहे.