जि.प.माजी अध्यक्ष डॉ.सतिश वारजुरकर यांच्या कडून ऑपरेशन साठी आर्थिक मदत

532

– चिमूर तालुक्यातील कपर्ला येथील भेट देऊन केली मदत
The गडविश्व
ता.प्र/ चिमूर, २ ऑगस्ट : विधानसभा क्षेत्रातील चिमुर तालुक्यांतील कपर्ला खुर्द येथील रहीवासी पांडुरंग धारणे यांना उपचाराकरिता चंद्रपूरचे माजी जि.प.अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर यांनी घरी भेट घेऊन आर्थिक मदत केली.
पांडुरंग धारणे हे काही दिवसांपासुन आजारी होते. दरम्यान हालकीच्या परिस्थितीत कुटुंबातील इतर सदस्य मोल मजुरी करून कुटुंब चालवत आहे. मात्र पुढील उपचाराकरिता परिस्थिती हलाखीची असल्याने अडचन येत होती. सदर बाब बाब येथील काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिश वारजुरकर
यांना कळविले. दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांनी विद्यानंद सावसाकडे यांचे नेतृत्वात धारणे यांच्या घरी जाऊन तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा युवक काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष रोषण ढोक, सरपंच तथा चिमूर तालुका कॉंग्रेस कमिटी सहसचिव रामदास चौधरी, माजी युवक कॉंग्रेस सरचिटनीस मंगेश रंदई, माजी चिमूर विधान सभा युवक कॉंग्रेस महासचिव प्रविण जिवतोडे, युवक कॉंग्रेस चिमूर माजी महासचिव अमित मेश्राम, आंबेनेरी ग्रा.पं. सरपंच संदिप दोडके तसेच कॉंग्रेस कार्यकर्ता व गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here