जिल्हा परिषदेत खळबळ : करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल

334

– एक कोटी २३ लाख ८९ फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
The गडविश्व
नागपूर, ३ ऑगस्ट : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातून कामाच्या काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये कंत्राटदाराने बनावट डीडी आणि एफडी सादर करत काम करून करारनामाकेल्यानंतर सुरक्षा अनामत रक्कम आणि परफॉर्मन्स अनामत रक्कम मुदतीपूर्वीच काढली तसेच दोन कामाच्या कंत्राटासाठी एकच सुरक्षा अनामत रक्कम आणि फरगोरम परफॉर्मन्स अनामत रक्कम वापरली. याकरिता कार्यलयाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही याप्रकरणी १ कोटी २३ लाख ८९ फसवणुकीचा गुन्हा नागपुरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये १० कंत्रातदाराविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
संजय लक्ष्मणराव बक्से (काटोल), संजय मारोतराव बडोदेकर ( नरखेड), महेंद्र पांडुरंग चिचघरे ( सूर्यनगर), विकेश धर्मदा हजारे (रमणा मारोती ), संजय शीतलाप्रसाद पांडे ( मानेवाडा), नीलेश सुरेशराव हिंगे रमणा मारोती), ओमप्रकाश महादेवराव बरडे (लोहारी सावंगा, नरखेड), महेश हरिदास गादेवार ( जुनी मंगळवारी), रमेश केमुरी ( हिवरीनगर), संदीप अरुणकुमार अवचट ( इतवारी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंत्राटदारांची नवे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या कंत्राटदारांनी ५ मार्च २०१९ ते १६ जानेवारी २०२२ यादरम्यान संगनमत करून लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद येथील विकासकामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतर कंत्राट मिळवले. त्यानंतर त्यांनी करारनामा करून त्याकरिता सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम व कामाचा दोष निवारण कालावधी पूर्ण झालेला नसताना दोन कामाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी एकच सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम वापरली.
याकरिता त्यांनी कार्यालयाची कोणतीही परवागी घेतलेली नव्हती अशी माहिती आहे. यातील आरोपी रमेश केमुरी आणि संदीप अवचट यांनी धामणगाव व कामठी येथील काम मिळवण्याकरिता स्वत:च्या फायद्याकरिता सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रकमेचा बनावट ‘डीडी’ आणि ‘एफडी’ सादर करून निविदा प्रक्रियेद्वारे सदरचे काम मिळविले.
या प्रकरणी आरोपींनी जिल्हा परिषदेसह शासनाची एकूण १ कोटी २३ लाख ८९ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 420,467 ,468 , 471, 34 भादंवि अन्वये सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here