देसाईगंज येथील नवीन बसस्थानकाच्या बांधकाम निवीदेला वाढीव दरसुची प्रदान करण्यात यावी

362

– आमदार गजबे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

The गडविश्व
देसाईगंज, ५ ऑगस्ट : अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या देसाईगंज शहरातील रखडलेल्या नविन बसस्थानकाच्या बांधकाम निवीदेला वाढीव दरसुची नुसार मंजुरी प्रदान करून बांधकाम तत्काळ सुरु करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की देसाईगंज शहर हे जिल्ह्याची मोठी बाजारपेठ, शैक्षणिक स्थळ व महत्वाची शासकीय कार्यालये असलेले ठिकाण असल्याने लगतच्या चारही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोकांचे आवागमन आहे. प्रत्येक तालुकास्थळी बसस्थानक असावे असे शासनाचेच धोरण असले तरी देसाईगंज येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सन-२०१७-१८ मध्ये राज्य शासनाने ४ कोटी ३२ लाख रुपये किमतीच्या नविन बस स्थानक बांधकामाला मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर मंजुरीच्या अनुषंगाने बांधकामासाठी जागा अधिग्रहित करुन बांधकाम सुरू करण्यासाठी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पुर्ण करून अंतिम मान्यतेसाठी ४ नोव्हेंबर २०१९ रोजी महाव्यवस्थापक म.रा.प.म.मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचेकडे सादर करुन सदर कामाचे रितसर भूमिपूजन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान स्वीकृत निवीदेला अंतीम मान्यता देऊन कंञाटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला नसल्याने नविन बसस्थानकाच्या बांधकामास सुरुवात होऊ शकली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची मागणी व स्थानिक वृत्तपत्रांतून वारंवार प्रकाशित करण्यात येत असलेल्या बातम्यांची दखल घेऊन मार्च २०२१ च्या अधिवेशनात,८ मार्च २०२१ रोजी तारांकित प्रश्न चर्चेदरम्यान विचारलेल्या पुरक प्रश्नात तत्कालीन परिवहन मंत्र्यानी कोरोना महामारी व लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे महामंडळाच्या महसूलात मोठी घट झाल्याने निधीच्या कमतरेमुळे देसाईगंज येथील बसस्थानकाचे बांधकाम सुरू न झाल्याचे मान्य करुन यथाशिघ्र निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते माञ अद्यापही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
तथापी निवीदा प्रक्रियेस २ वर्षाचा कालावधी लोटला असल्याने दरसुची नुसार अंदाजपत्रकातही वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने व बसस्थानका अभावी निर्माण झालेली प्रवाशांची अडचण लक्षात घेता देसाईगंज येथे मंजुर असलेल्या नविन बसस्थानक बांधकामाच्या निविदेला तत्काळ वाढिव दरसुची नुसार मंजुरी प्रदान करून बांधकाम यथाशिघ्र सुरु करण्याची मागणी आमदार गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here