रांगी येथे निपुण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळा संपन्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी केंद्रा अंतर्गत निपुण भारत कार्यक्रमा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा काल ६ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडली.
धानोरा पंचायत समितीच्या वतिने विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्याकरिता राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यांपैकी निपुण भारत अभियानाबाबत जाणीव जागृती करण्याकरिता रांगी केंद्रातील सर्व शिक्षकांचे वर्ग १ तेन८ तसेच अंगणवाडी सेविका यांचे केंद्रस्तरीय कार्यशाळा रांगी येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेली होती. सदर निपुण भारत कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेला केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार याच्या उपस्थितीत सुलभक म्हणून रांगी शाळेतील शिक्षक हेमंत कांटेगे, निमगाव शाळेतील शिक्षिका नाकतोडे, शिक्षक सुरपाम आणि शिक्षक मडावी यांनी कार्य केले. यावेळी केंद्रातील सर्व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
