– अतिवृष्टीचा शेतकऱ्यांनाही फटका, पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक मार्ग बंद
गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : जिल्हयाला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. जिल्हयात अतिवृष्टी झाली यामुळे अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तर जिल्हयातीन अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले आहे. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आज १० ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार जिल्हयात ६४.४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर बेडगाव सर्कलमध्ये सर्वाधिक २०७.६ मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून १ जून पासून आतापर्यंत जिल्हयात १२५३.४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीने जिल्हयातील अनेक ठिकाणी पुर पहावयास मिळत आहे. देसाईगंज तालुक्यातील चोप येथील दोन घरांची भिंत कोसळल्याची घटना सामोर आली आहे यामुळे त्या नागरिकांपुढे निवाऱ्याचे संकट उभे झाले आहे. तर जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना-जेप्रा मार्गावरील नाल्याच्या रपटयाजवळील रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे सदर मार्ग बंद आहे. तर जिल्हयातील इतरही मार्ग पुरामुळे बंद झाले आहे.

हे मार्ग आहेत बंद
गडचिरोली जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यामुळे बंद असलेले मार्ग
१० ऑगस्ट २०२२. वेळ स. ८.०० वा
आरमोरी – गडचिरोली, गडचिरोली – चामोर्शी, आष्टी – गोंडपिंपरी, गडचिरोली – माडेमूल,कूंभी, तसेच पोर्ला- नवरगाव, साखरा- चूरचूरा, चूरचूरा -नवरगाव, आलापल्ली – भामरागड लाहेरी बिनागुंडा, आरमोरी रोड ते जोगी साखरा, आरमोरी ते रामाला (वैरागड), आरमोरी रोड ते ठाणेगाव
अतिवृष्टीने नदीच्या तसेच धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका नुसार पावसाची नोंद मीमी मध्ये
गडचिरोली-६३.२, कुरखेडा-११६-५, आरमोरी-८१-७, चामोर्शी -४१.३, सिरोंचा ७.७, अहेरी १८.३, एटापल्ली ३४.०, धानोरा ६४.१, कोरची १६६.६, देसाईगंज ९५.२, मुलचेरा २२.४, भामरागड २६.३
सर्कलनुसार पावसाची नोंद मीमी मध्ये
बेडगाव सर्वाधिक २०७-६, कुरखेडा- १४०-२, आरमोरी- १३८.२, कोरची- १५४.०, कोटगुल- १३८- २, गडचिरोली-६८.४, पुराडा- १०२-४, कढोली-१०७.०, देऊळगाव-६८.४, वैरागड- ७५-६, येणापूर-६६.२, मुरुमगाव-९१.४, पेंढरी-६५.४, देसाईगंज ९६.०, शंकरपूर-९४. ३