गावात दारू पिऊन येणाऱ्यावर आकारणार दंड

322

– लेखा येथे मुक्तीपथ ग्रापं समिती गठीत
The गडविश्व
गडचिरोली,१० ऑगस्ट : धानोरा तालुक्यातील लेखा येथे आयोजित ग्रामसभेत मुक्तीपथ ग्रापं समिती गठित करण्यात आली. यावेळी इतर ठिकाणावरून दारू पिऊन गावात प्रवेश करणाऱ्यावर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक देवाजी तोफा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत बैठकीत ग्रामसेवक एन.बी.ढवळे, पोलीस पाटील सुरेश उसेंडी, ग्रामसभा सचिव सदुकर हलामी, सचिन उईके, संदिप राऊत, ममता आलाम, नंदा दुगा, मेघा शेंडे, ग्रामसभा अध्यक्ष जगदीश राउत, जनाबाई पदा, निर्मला राउत यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी समिती गठीत करून गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी चर्चा करण्यात आली. गावातील व्यक्ती बाहेरगावावरून दारू पिऊन आल्यास त्या व्यक्तीवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तंबाखु विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखुविक्री बंद करणे, गापं अंतर्गत येणारे व सर्व कार्यालये दारू व तंबाखुमुक्त करणे आदी निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच या गावातील लोकांची संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण गाव व्यवनमुक्त करणे व गावाबाहेर दारू विक्री करणाऱ्यावर संघटनेच्या माध्यमातून कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here