किशोरी संजिवनी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात चार तालुक्यात राबविणार : सीईओ कुमार आशीर्वाद

264

– पारडी येथील कार्यक्रमात गरोदर माता किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र “आझादी का अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन १० ऑगस्ट २०२२ रोजी महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प गडचिरोली मधील अंगणवाडी केंद्र.पार्डी कुपि येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत किशोरी संजिवनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम धानोरा, अहेरी, भामरागड व एटापल्ली या ४ तालुक्यातील १४ ते १८ वर्ष या वयोगटातील ज्या किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. अशा किशोरवयीन मुलींना मोहफुल पासून तयार करण्यात आलेले लाडू, अंगणवाडी सेविका /मदतनिस यांच्या मार्फतीने तयार करून आशा वर्कर यांच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे. जेणेकरून किशोरवयीन मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच समाजामधील भावी पिढीतील बालक
सुदृढरित्या जन्माला येण्यास मदत होणार आहे. या प्रमुख उद्देशाने किशोरी संजिवनी हा उपक्रम गडचिरोली जिल्हयातील वरील चार तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. घेण्यात आलेल्या उक्त कार्यक्रमास जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वत: उपस्थित राहुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांना आरोग्य व पोषण आहार विषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी गावातील महिला, किशोरवयीन मुली तथा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी(बा.क.), श्रीमती अर्चना इंगोले, पंचायत समिती, गडचिरोलीचे गट विकास अधिकारी डी.एस.साळवे, पं. स. गडचिरोलीचे कृषी अधिकारी, पी. पी. पदा, भोयर, विस्तार अधिकारी, मोटघरे, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नारायण परांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गडचिरोली, श्रीमती एल. टी झरकर अंगणवाडी पर्यवेक्षिका, श्रीमती कुसुम नागोसे, श्रीमती चंद्रकला रायपुरे, अलका लेनगुरे, उषा सोनुले, अंगणवाडी सेविका व श्रीमती ललीता मडावी, निता खोब्रागडे मदतनीस, यांनी केले. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here