जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिराली येथे आतंरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रॅली

169

The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : आतंरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल १२ ऑगस्ट रोजी आतंरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याकरीता जनजागृती होण्याकरीता एचआयव्ही/एड्स या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली येथुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पर्वावर आतंरराष्ट्रीय युवा दिनाची रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.अतुल बोराडे, समन्वयक शासकिय तंत्रनिकेतन सुरेंद्र बाबोंळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, सर्व मराएनिसोचे कर्मचारी उपस्थित होते.
१२ ऑगस्ट २०२२ हा आतंरराष्ट्रीय युवा दिनाचे या वर्षाचे घोषवाक्य “पिढीजात एकात्मता : सर्व वयोगठासाठी जग तयार करणे”होणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाकरीता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here