– २ जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मिळाले पोलीस पदक
The गडविश्व
गडचिरोली , १४ ऑगस्ट : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ४१ अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक व ०२ पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली (gadchiroli) पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
मनिष कलवानिया भापोसे. पोलीस अधीक्षक, औरंगाबाद , समीर शेख भापोसे, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली, भाऊसाहेब ढोले, डिवायएसपी, पोनि संदिप भांड, पोनि संदिप मंडलिक (1″ BAR TO PMG), सपोनि महारूद्र परजने, सपोनि मोतिराम मडावी (1″,2nd BAR TO PMG), सपोनि योगिराज जाधव, पोउपनि राजरत्न खैरनार, पोउपनि दयानंद महाडेश्वर, पोउपनि हर्षल जाधव, शहीद पोउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर), पोहवा स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर), पोहवा / सेवकराम मडावी, नापोशि/ राजु कांदो, नापोशि/ दामोधर चिंतुरी, नापोशि/ राजकुमार भलावी, नापोशि/ सागर मुल्लेवार, नापोशि/ शंकर मडावी, नापोशि/ रमेश आसम, नापोशि/ जिवन उसेंडी, नापोशि/ राजेंद्र मडावी, नापोशि/ मनोज गज्जमवार, नापोशि/ सुभाष वाढई , नापोशि/ दसरू कुरसामी, पोशि/ अविनाश कुमरे, पोशि/ गोंगलु तिम्मा, पोशि/ महेश सयाम , पोशि/ साईकृपा मिरकुटे, पोशि/ रत्नय्या गोरगुंडा , पोशि/ विलास पदा, पोशि/ मनोज इस्कापे, पोशि/ अशोक मज्जी, पोशि/ देवेंद्र पाकमोडे, पोशि/ रोहित गोंगले, पोशि/ दिपक विडपी, पोशि/ सुरज गंजिवार, शहीद पोशि/ किशोर आत्राम (मरणोत्तर), पोशि/ योगेश्वर सडमेक, पोशि/ अंकुश खंडाळे, पोशि/ गजानन आत्राम या जवानांना पोलीस शौर्य पदक मिळाले.
तसेच सहा. फौ/ प्रविण बेझलवार, सहा. फौ/ प्रमोद ढोरे, यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.
तसेच सीआरपीएफ, गडचिरोली (एमएस) येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक/जीडी, ०९ बीएन विजय कुमार )यांना सुद्धा राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.
पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा.(ankit goyal) यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
देशातील १,०८२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके
३४७ शौर्य पुरस्कारांपैकी २०४ जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, ८० जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि १४ जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १०९, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या १०८ , सीमा सुरक्षा दलाच्या १९ , महाराष्ट्र पोलीस दलाच्या ४२ , छत्तीसगड पोलीस दलाच्या १५ जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत.
महाराष्ट्रातील ‘या’ पोलीस जवानांना पदके
माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.
Heartiest congratulations to all warriors of #GadchiroliPolice on being selected for Police Medal for Gallantry.Highest total for a district force in the country.
We also pay tribute to the 3 fallen heroes who were selected posthumously. pic.twitter.com/sBuCfgg6NN— Ankit Goyal (@ankitgoyal_ips) August 14, 2022