अतिदुर्गम कोठी येथे ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन

176

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यांला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आझादी का अमृत महोत्व साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून गडचिरोली जिलहयातील अतिदुर्गम कोठी येथे पोलीस विभाग, शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कोठी, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने ‘हर घर तिरंगा’ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅली मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत व राष्ट्रीय घोषणा देवून परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. तसेच घरोघरी जावून तिरंगा ध्वजाचे वितरण करून घराच्या प्रदर्शनिय जागेत उंचावर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज उभारावा असे सांगण्यात आले व भारतीय ध्वज संहितेबाबत थोडक्यात माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here