– वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु हेच स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे. यासोबतच आपण गावांमध्ये स्वच्छता ठेवू या, हिच खरी देशसेवा आहे आणि हेच खरे देशप्रेम आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. ते आज जिल्ह्यातील प्रसिध्द व ऐतिहासिक वैरागड येथील किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली ९ ते १७ ऑगष्ट २०२२ या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज १४ ऑगष्ट २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द व ऐतिहासिक वैरागड येथील किल्ल्यावर जिल्हा परिषद, गडचिरोलीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, भाप्रसे यांचे हस्ते सकाळी ०७ : ३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद मुलांची शाळा वैरागड येथे वृक्षारोपण करण्यांत आले. यावेळी “माझी कन्या भाग्यश्री योजना” २०१७ अंतर्गत कु. काव्या राजेश्वर दोनाडकर यांना २५ हजार रुपये , कु. अनन्या राजेश्वर दोनाडकर यांना २५ हजार रुपये, कु. नव्या प्रमोद धोंगडे यांना २५ हजार रुपये चा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, भाप्रसे यांचे हस्ते वितरित करण्यात आले.
#गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या ऐतिहासिक किल्ल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.#HarGharTiranga pic.twitter.com/Xw7mBcMO0k
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) August 14, 2022
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते. यावेळी त्यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमांबद्दल उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार हरीरामजी वरखडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र .एम. भुयार, फरेंद्र आर. कुतीरकर, प्रकल्प संचालक, जल जिवन मिशन, कल्याणकुमार डहाट, तहसिलदार आरमोरी, खातेप्रमुखांमध्ये शेखर माधव शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), रविंद्र कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), ओंकार अंबपकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्रीमती अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), अमित तुरकर, कार्यकारी अभियंता (ग्रापापु), अरुण धामणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा), चेतन हिवंज, गट विकास अधिकारी पं.स. आरमोरी, श्रीमती संगिताताई पेंदाम, सरपंच वैरागड, भास्कर बोळणे, उपसरपंच वैरागड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन राजू वडपल्लीवार केंद्रप्रमुख सिर्सी आणि मोहझरी यांनी केले. तर आभार संगीताताई पेंदाम, सरपंच ग्रामपचायत वैरागड यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भास्कर बोळणे, उपसरपंच वैरागड, कोकडे, गट शिक्षण अधिकारी, राजकुमार पारधी, वि. अ. पं.स. आरमोरी, प्रभाकर बोधेले, ग्रामविकास अधिकारी, भाकरे, बोबाटे, उंदिरवाडे, राऊत, तसेच ग्राम पंचायत वैरागड येथील पदाधिकारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल पंचायत समिती, आरमोरी येथील अधिकारी व कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत वैरागड पदाधिकारी व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन केले.