पुन्हा वाघाचा हल्ला, शेतकरी ठार

1485

– आठवड्यातील चौथी घटना, परिसरात भीतीचे वातावरण

The गडविश्व
ब्रम्हपुरी, १७ ऑगस्ट : ‍‍‍‍‍‍‍‍तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची आठवड्यातील चौथी घटना अड्याळ येथील शेतशिवारात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. विलास विठोबा रंधये (४८) असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या ब्रह्मपुरी पासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अड्याळ येथे मेंढा येथील रहिवासी विलास विठोबा रंधये यांचे शेत असल्याने आज शेतामध्ये निंदा सुरू असताना गेले होते. दरम्यान ते निंदाची देखरेखीकरिता जंगलालगतच्या उंच बांधीवरून उभे होऊन देखरेख करत असताना वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेतला यात विलास रंधये ठार झाले. सदर घटना परिसरातील आठवड्यातील चौथी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. सदर घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेत शिवारात काम करायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here