– कुंभीटोला च्या महिलांची कुरखेडाचे पोलीस निरीक्षक अभय आष्टेेकर यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
कुुरखेेडा, १८ ऑगस्ट : तालुक्यातील कुंभीटोला गावामध्ये काही वर्षांपासून दारू विक्री केली जाते. त्यामुळे याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. दारूच्या आहारी जाऊन युवापिढी बिघडत चालली आहे. लहान शाळकरी मुलांना दारूचे व्यसन लागले आहे. गावात भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
महिलांनी व गावातील पुरुषांनी या अगोदर दारूविक्री बंदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुजोर दारू विक्रेते असल्याने त्यांनी आपली विक्री सुरूच ठेवली रस्त्यानी जाणाऱ्या व येणाऱ्या महिलांना दारू विक्री करणाऱ्याकडून शिवीगाळ मोठया प्रमाणात केल्या जाते. त्यामुळे गावातील दारु विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुंभीटोला च्या महिलांनी कुरखेडाचे पोलीस निरीक्षक अभय आष्टेेकर यांना काल १७ ऑगस्ट रोजी निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हय़ात २७ मार्च १९९३ पासून दारूबंदी आहे, परंतु अवैध मार्गाने मिळणाऱ्या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. म्हणूनच या महिलांनी दारूबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणी निमित्ताने पोलिसांना मागणी केली. तसेच आम्ही आमच्या गाव स्तरावर दारूविक्रेत्यांची दारू नष्ट करून दारू बंद करण्याचा प्रयत्न करू. एवढे सर्व करून सुद्धा दारू विक्री बंद होत नसेल तर पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
निवेदन देतांना तंटामुक्त अध्यक्ष किशोर भांडारकर, मुक्तीपथ चे मयूर राऊत, जमनाबाई मडावी, शेवंताबाई हलामी, सुरेंद्र मडावी, मनीष गावडे, नरेश मडावी, चेतन गहाणे, अनिकेत तलांडे, अभिषेक खुरसे, दिनेश सहारे व गावतिल समस्त महिला तथा तरुण उपस्थीत होते.
