सिरोंचा-आलापल्ली-आष्टी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार : खा.अशोक नेते

275

– रस्त्याची दखल घेत दिले अधिकाऱ्यांना दिले निर्देश
The गडविश्व
गडचिरोली , २० ऑगस्ट : सिरोंचा- आलापल्ली-आष्टी या या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याची दखल खा.अशोक नेते यांनी घेत संबंधित विभागाचा आढावा घेतला असता सदर रस्ता दुरूस्ती करण्यासाठी रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याकरिता संबंधित वन विभागाचे नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क करून तातडीची बैठक घेऊन रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे निर्देश दिले.
सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे सिरोंचा, आलापल्ली, आष्टी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होणे नाकारता येत नाही. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जड वाहतुकीची ट्राफिक बराच वेळ बंद होती. त्यामुळे याची दखल घेत फोनद्वारे अधिकाऱ्यांना खा.अशोक नेते निर्देश दिले तसेच सिरोंचा, आलापल्ली, आष्टी हा मेन रोड दुरूस्ती करण्यासाठी रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचण निर्माण होत आहे. त्याकरिता संबंधित वन विभागाचे नोडल ऑफिसर याच्याशी संपर्क करून यांच्याशी तातडीची बैठक घेऊन रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे निर्देश. खा.अशोक नेते यांनी दिले.
येवेळी खा.अशोक नेते, एस.टी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, संघटन जि. महामंत्री रविंद्रजी ओल्लावर, वनविभागाचे अधिकारी
उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here