गडचिरोली : ‘ते’ पुन्हा आले, मुरुमगाव-मालेवाडा जंगल परिसरात हत्तींचा कळप

3545

– नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालचे पथकाला केले पाचारण
The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : जिल्हयात पुन्हा एकदा ओडीसा राज्यातील जंगली हत्तीनी एन्ट्री केली आहे. जिल्हयातील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव-मालेवाडा जंगल परिसरात हत्तींचा कळप असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ.मानकर यांनी दिली असून कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालचे पथक (हुल्ला पार्टी) जिल्हयात दाखल झाले आहे.
जिल्हयात गत वर्षी ऑक्टोबरमध्ये छत्तीसगड राज्यातून हत्तींनी प्रवेश केला होता. त्यादरम्यान हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवत शेतपिकासह घरांचे नुकसान केले होते. काही दिवसांपूर्वीत पुन्हा छत्तीसगड राज्यातून जंगली हत्तीच्या कळपाने जिल्हयात प्रवेश केल्याने खळबळ उडाली असून या हत्तीपासून शेतमाल व नागरिकांच्या घराचे नुकसान होवू नये म्हणून यासाठी वनविभाग सतर्क झाले आहे. या हत्तींच्या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना करित आहे. कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालच्या हत्ती नियंत्रण पथकाला (हुल्ला पार्टी) जिल्हयात पाचारण करण्यात आले आहे. या पथकामध्ये ८ सदस्यांचा समावेश असून जंगली हत्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे पथक प्रयत्न करीत आहे. तर या कळपात २० ते २५ हत्ती असण्याची शक्यता आहे, कोदेकनार गावात हत्तीनी प्रवेश केला होता तसेच बंगाल मधून आलेल्या हत्ती नियंत्रण पथकाकडून आपल्या कडील काही लोकांना ते प्रशिक्षण देण्याचेही काम सुरू आहे अशी माहितीही मुख्य वनसंरक्षक डॉ.मानकर यांनी दिली आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हत्तींचा कळप गावात पोहचू नये यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here