गडचिरोली जिल्ह्यातील ६५० दिव्यांगाना मिळाले दिव्यांग साहीत्य, प्रमाणपत्र व बस सवलत कार्ड

539

– पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग महामेळावा
The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ६५० दिव्यांगाना मिळाले दिव्यांग साहीत्य, प्रमाणपत्र व बस सवलत कार्ड वाटप करण्यात आले. आज २२ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल, गडचिरोली येथे दिव्यांग महामेळावा पार पडला.
जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा व त्यांनी आपले जीवनमान उंचवावे, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन, गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांगासाठी आज २२ ऑगस्ट २०२२ रोजी दिव्यांग महामेळावा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल, गडचिरोली येथे पार पडला.
सदर दिव्यांग महामेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ६५० दिव्यांगाची तपासणी करून त्यांना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप करण्यात आले. ज्या दिव्यांग नागरीकांना व्हिलचेअरची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत व्हिलचेअर वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करतांना मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर राबवुन ९९२ दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र, ६३० दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, ८५० दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना, ४१० दिव्यांग नागरीकांना साहीत्य वाटप, ४११ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय इत्यादी साहीत्य वाटप करण्यात आलेले आहेत.
रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल ड्युटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ५२ असे एकुण २५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला १८७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, टु-व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण-६४, भाजीपाला लागवड ४४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टू/फोर व्हिलर प्रशिक्षण ३९० व एमएससीआयटी-२०० असे एकुण ३०१२ युवक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा., तसेच डॉ. इंद्रजित नागदेवते (फिजीशियन), डॉ. मनीष मेश्राम ( मानसिक रोग तज्ञ) जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, श्रीमती पी डी पारसे सहायक लेखा अधिकारी, गडचिरोली मंगेश पांडे, आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परि. वि. गडचिरोली हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीच्या टीमने अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here