गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून बि- बियाणे, फळझाड रोपे व कृषी साहित्य वाटप

699

The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्याने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज २५ ऑगस्ट २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोनापूर, गडचिरोेली यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य कृषी मेळावा’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.
यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील ६०० शेतकरी उपस्थित होते. १०१ बचत गटांना प्रत्येकी एक याप्रमाणे १०१ स्प्रेअर पंप, ०८ शेतक­यांना चिखलणी यंत्र, २२५ शेतक­यांना प्रत्येकी १० किलो याप्रमाणे एकुण २२५० किलो धान बियाणे, १० शेतक­यांना प्रत्येकी १० किलो याप्रमाणे १०० किलो सोयाबिन बियाणे, १०० शेतक­यांना प्रत्येकी १० याप्रमाणे १००० चिकू, फणस, लिंबु, काजु इ. फळझाड रोपे, ५० शेतक­यांना प्रत्येकी १५ याप्रमाणे कुक्कुट पक्षी वाटप करण्यात आले.
आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत ११,६३३ शेतक­यांना कृषी बियाणे, ४४४ शेतक­यांना कुक्कुटपालन प्रशिक्षण देवून कुक्कुट पक्षी व खाद्य व भांडी, १०० शेतक­यांना बदकपालन प्रशिक्षण देवून बदक पक्षी खाद्य व भांडी, ४४० शेतक­यांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण व बियाणे किट, ८७ शेतक­यांना मत्स्य पालन प्रशिक्षण मत्स्य बीज व खाद्य, ३२ शेतक­यांना मधुमक्षीकापालन प्रशिक्षण, १७० शेतक­ऱ्यांना कृषी दर्शन सहल, ८० शेतक­यांना शेळी पालन प्रशिक्षण, ५०० शेतक­यांना शेवगा लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे, ५०० शेतक­यांना पपई लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे, ५०० शेतक­यांना सिताफळ लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे वाटप करण्यात आले. तसेच २०२३ शेतक­यांचे महाडिबीटीमध्ये ऑनलाईन फार्म भरून काटेरी तार योजना, विहीर सिंचन योजना, आधुनिक शेती अवजार योजना, कृषी स्वावलंबन योजना, पीक विमा योजना, पशु संवर्धन योजना इत्यादीचा लाभ मिळवून दिला. ६०९२ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत फार्म भरून लाभ मिळवून देण्यात आला. असे एकुण २३,०६१ शेतक­यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
याप्रसंगी उपस्थित शेतक­यांना जिल्हाधिकारी संजय मिणा सा. यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले की, गडचिरोली पोलीस दलाचा पोलीस दादालोरा खिडकी हा उपक्रम कौतुकास्पद असून, आतापर्यंत २ लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दलाचे जिल्ह्राच्या विकासात भरीव योगदान मिळालेले आहे. जिल्ह्रातील नागरिकांनी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा. गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.
यावेळी कृषी मेळाव्यास जिल्हाधिकारी संजय मिणा सा., पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे तसेच कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोनापूर, विषय विशेषतज्ञ (पशु संवर्धन व दुग्धशाळा) विक्रम कदम, विषय विशेषतज्ञ (कृषी हवामान शास्त्र) बुध्दावार, कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली श्रीमती शितल खोबरागडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here