The गडविश्व
गडचिरोली, २६ ऑगस्ट : येथील जिल्हा परिषद मध्ये चपराशी पदावर कार्यरत असलेले गोकुळनगर येथील रहिवाशी अमोल यादव निकोडे (२६) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवार २५ ऑगस्ट रोजी रात्रौ ११ वाजता च्या दसरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर आज २६ ऑगस्ट ला कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
अमोल निकोडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील थेरगाव येथील रहिवासी आहेत. ते नोकरी सोबतच इलेक्ट्रॉनिक बाईक व प्लॉट विक्री व्यवसाय करीत होते. ते स्वभावाने मनमिळाऊ होते. त्यामुळे ते जनमानसात परिचयाचे होते.