कुरखेडा : विद्यानगर येथील अतिक्रमण धारकावर कारवाई करा

190

– नागरीकांची उपविभागीय अधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी
The गडविश्व
कुरखेडा, २६ ऑगस्ट : येथील देसाईगंज मार्गावर असलेल्या विद्यानगर येथील शेती व शहरातील पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याचा प्रवाह विरुद्ध दिशेने करत पक्के बांधकाम केल्याने पावसाचे पाणी अडत असल्याने वारंवार पूरपरिस्थीती निर्माण होत आहे. त्यामुळे वार्डातील अनेक घरात पाण्याचा शिरकाव होत आहे याचा नाहक त्रास वार्डवासीयांना सहन करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढत पाण्याचा मार्ग पूर्ववत खूला करण्यात यावा अशी मागणी येथील नगरपंचायत पदाधिकारी सह वार्डवासीयांनी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांची भेट घेत केली आहे.
यावर्षी पावसाळ्यात या नाल्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमीत बांधकामामूळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग अवरूद्ध होत विद्यानगर वार्ड अनेकदा जलमय झाले व अनेक घरात पाणी शिरले. यात वार्डवासीयांचे मोठे आर्थीक नूकसान होत त्याना शारिरिक त्रास सहन करावा लागला यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जेसीबीच्या मदतीने पाणी वाहून जाण्याचा काही भाग मोकळा करण्यात आला. मात्र या तात्पूरत्या उपाययोजनेने काही प्रमाणात पाण्याची निकासी होत असली तरी अधिक पाणी आल्यास पाणी पास होत नाही व वार्डात अनेक घरात त्याचा शिरकाव होत नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायम उपाययोजना म्हणून नाल्यावर अतिक्रमण करीत प्रवाह अवरूद्ध करणारे बांधकाम हटविणे गरजेचे असल्याने सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी वार्डवासीयानी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. यावेळी तहसीलदार सोमनाथ माळी हे सुद्धा उपस्थित होते.
नाल्याचा जागेवर आहे का याबाबद शहानिशा करण्याचे व तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश स्वरूपी दिले व बांधकाम नाल्याच्या जागेवर असल्यास अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
याप्रसंगी नगराध्यक्षा अनिता बोरकर, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, शिवसेना गटनेता आशिष काळे, नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल, अशोक कंगाले, वार्डवासीय माही खंडाईत, शामलता मीरी, प्रतिभा औरासे, रेखा नैताम, रश्मी जोगे, मंजू गावतूरे, माधुरी सोनकुसरे, प्रभा बोरकर तसेच वार्डातील महिला भगीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here